अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून शिल्पा चव्हाण यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून शिल्पा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सेवा कार्य प्रणाली शाखेत होत्या.

गणेशोत्सव व कोरोनाच्या काळात देखील आयुक्तांनी अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक कल्पना जाधव यांची आयुक्तालयात व उपनिरीक्षक सूरज गोरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली होती.

याप्रकणात उपनिरीक्षकाने अर्जात कारवाई करताना हलगर्जीपणा केल्याने या बदल्या करण्यात आल्याचे बोलले जात होते. उपनिरीक्षकाच्या चुकीची शिक्षा मात्र वरिष्ठ निरीक्षकाने देखील भोगावी लागल्याचे खासगीत बोलत जात होते. दरम्यान आज वरिष्ठांनी अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून शिल्पा चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.