Shinde-Fadnavis Government | वेदांता-फॉक्सकॉन, एअरबससारखे महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातला का गेले? राज्य सरकार लवकरच श्वेतपत्रिका काढणार

मुंबई : Shinde-Fadnavis Government | राज्यात येणारे वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), टाटा एअरबससारखे (Tata Airbus) प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातला जात असल्याने महाराष्ट्रातील तरूणांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रोजगार निर्माण होण्याची शक्यता या प्रकारामुळे कमी होत चालली आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनीही शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) घेरले आहे. सत्ताधारी शिंदे गट (Shinde Group) -भाजपा (BJP) आणि विरोधी पक्ष यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या आरोपांचे सत्य तपासण्यासाठी लवकरच राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Udaya Samant) यांनी दिली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, 15 दिवसांपासून खोटे बोलण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सॅफ्रोन कंपनी गेली, त्याचे खापर फोडण्याचे काम केले जात आहे. एअरबस आणि सर्व प्रकल्पांच्या संदर्भात श्वेतपत्रिका सादर करणार आहे.

सामंत म्हणाले, जर कुणाला मॅन्युपुलेट केल्याचे वाटत असेल तर त्यांनी माहितीच्या अधिकारात जाऊन माहिती घ्यावी. मी प्रकल्प आणले असे माझ्या तोंडात घातले गेले. मात्र मी कधीही असे म्हणलेले नाही. वेदांताबाबत उच्चस्तरीय बैठक का होऊ शकली नाही, याची माहिती द्या. रायगडमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारी कंपनी पुन्हा जात आहे, त्यांनी म्हंटले आहे की मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक झाली नाही, त्यामुळे आमचे काही मुद्दे आहेत, त्यावर निर्णय झाला पाहिजे. (Shinde-Fadnavis Government)

उदय सामंत पुढे म्हणाले, एअरबस संदर्भात कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. याची कोणतीही माहिती माझ्या विभागाकडे नाही. माजी उद्योगमंत्र्यांनी बारसूची रिफायनरी सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रव्यवहार केला, असे म्हटले. मग रिफायनरीला विरोध का? हे अजूनही मला कळले नाही. रिफायनरी होऊ देणार नाही, असे खासदार म्हणतात. नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केले पाहिजे.

सामंत म्हणाले, काल दोन प्रकल्प महाराष्ट्रात यायला सुरुवात झाली आहे. मी राज ठाकरे (Raj Thackeray),
अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करेन.
अंबादास दानवे (Ambadas Danve) विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी जर माहिती मागितली तरी त्यांना मी ती
द्यायला तयार आहे. काल 2 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्राने महाराष्ट्राला दिले आहेत. ही सुरूवात आहे.
जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत किती उद्योग आले हे म्हणणे योग्य नाही.
आदित्य ठाकरे यांनी राजीनामा मागायचा आणि तो द्यायचा एवढे आम्ही राजकारणातील दुबळे नाहीत.

Web Title :-  Shinde-Fadnavis Government | vedanta foxconn tata airbus projects maharashtra government to give report says uday samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

Ravi Rana | माझ्या विरोधात 50 लोक उभे राहिले, तरी मी निवडून येईन – रवी राणा