Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shinde-Fadnavis Govt | मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह इतर अनेक नेते उपस्थित होते. यावेळी महत्वपूर्ण 16 निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार योजना, पिंपरी चिंचवड विद्यापीठ, नोकरभरती आदी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत या निर्णयांची माहिती दिली आहे. (Shinde-Fadnavis Govt)

16 महत्वपूर्ण निर्णय खालीलप्रमाणे (Shinde-Fadnavis Govt) :

– जलयुक्तशिवार अभियान 2.0 सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार.

– जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. 2226 कोटी सुधारित खर्चास मान्यता.

– आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील 1585 रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार.

– खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड. राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार.

– गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय.

– शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना. नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणी.

– राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

– शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात 60 टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ.

– कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासा ऐवजी वाढीव दंडाची तरतूद.

– 13 सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार.

– पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास 50 कोटी अनुदान देणार.

– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार.

– पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता.

– महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ साठी निर्गुन्हेगारीकरण करणार.

– राज्यातील शाळांना अनुदान. 1100 कोटींना मान्यता.

– महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत.

 

Web Title :- Shinde-Fadnavis Govt | 16 important decisions in the Shinde-Fadnavis cabinet meeting, know in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा शोध लागला; अजित पवारांची माहिती

IND vs BAN Test | भारताचे ‘हे’ 3 खेळाडू रचू शकतात इतिहास; व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजाराही समावेश

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार