शिर्डीत काँग्रेसला मोठा धक्‍का ; मतदानाच्या काही दिवस आधीच जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

पक्ष सोडणार नसल्याचा दावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडल्याचे ससाणे यांनी सांगितले.

शिर्डीचे काँग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान साईबाबांच्या झोळीत हात घालणा-याचे कधीच चांगले झाले नाही, असे वकतव्य केले होते. यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाणे समर्थक नाराज होते. त्यामुळे समर्थक कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाक्ष्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काल ससाणे समर्थकांचा मेळावा घेतला होता. तर आज येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर ससाणे यांनी राजीनामा दिला.

करण ससाणे यांचे वडील दिवगंत आमदार जयंत ससाणे साईबाबा संस्थानचे सात वर्षे अध्यक्ष होते. ससाणे हे काही दिवसांपूर्वीच अण्णासाहेब शेलार यांना हटवून काँग्रेस जिल्हाध्यक्ष.पदी विराजमान झाले होते.