Coronavirus : पनवेलवरून शिरूरला आलेल्या 52 वर्षाय व्यक्तीचा अहवाल ‘कोरोना’ पाॅझिटिव्ह, शहर व परिसरात चिंतेचे वातावरण

शिरूर : पनवेलवरून शिरूरला आलेल्या 52 वर्षाय व्यक्तीचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.बाहेर गावावरून आलेला बाधित रूग्ण आढळुन आल्याने शिरूर शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली असुन चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेलवरून दि.२७ रोजी रात्री चार जण शिरूरला नातेवाईकांकडे आले असुन त्यांना नगरपरिषदेच्यावतीने दि.२८ रोजी होम क्वारंटाईन करण्यात आले होते.सदर पनवेलवरून आलेल्या व्यक्तीची कोरोना तपासणी १९ मे रोजी पनवेलमध्ये करण्यात आली होती सदर तपासणीचा अहवाल शुक्रवार दि.२९ रोजी पाॅझिटिव्ह आल्यानंतर तेथील प्रशासनाने या व्यक्तीचा शोध घेतला असता त्यांना शिरूरला आल्याची माहिती मिळाली असता तेथील प्रशासनाने सदर बाब कळवुन माहिती दिल्यानंतर शिरूर प्रांत यांनी सदर रूग्ण बाधित असल्याबाबतची माहिती डाॅ.पाटील व मुख्याधिकारी रोकडे यांना कळविल्यानंतर बाधित रूग्णाची तपासणी करून त्यांना तसेच बाधित रूग्णाचा २२ वर्षीय मुलामध्ये लक्षणे दिसुन येत असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवले असुन त्यांच्या संपर्कात आलेले उर्वरीत पनवेलवरून आलेल्या दोन महिला व शिरूर येथील चार नातेवाईक यांना कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

पनवेलवरून शिरूरला आलेल्यांपैकी एक जणाचा अहवाल पाॅझिटीव्ह आलेला असुन नागरिकांनी व नातेवाईकांनी बाहेर गावांवरून आलेल्या व्यक्तींची माहिती नगरपरिषदेस कळवावी.शिरूर शहरात पहिला रूग्ण बाधित आढळुन आल्याने कोरोनाने शहरात शिरकाव केला आहे.नगरपरिषदेच्यावतीने शहरात वारंवार जंतुनाशक औषध फवारणी,र्सदी,खोकला व तापाच्या रूग्णांसाठी शहरात विविध ठिकाणी जनता दवाखाने सुरू करण्यात आलेले असुन यांसह विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडु नये तसेच सोशल डिस्टन्स,तोंड,नाक व डोळ्यांना हाताने स्पर्श करू नये,वारंवार साबनाने हात स्वच्छ धुणे यांसह प्रशासनाच्या नियमांचे व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.६० वर्षाच्यावरील ज्येष्ठांनी तसेच १० वर्षाच्या आतील मुलांनी घराच्या बाहेर पडु नये.
महेश रोकडे
मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद