Shirur Lok Sabha Election 2024 | मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी रद्द! ‘वंचित’चा मोठा निर्णय, फडणवीसांची भेट माहागात पडली (Video)

पुणे : Shirur Lok Sabha Election 2024 | पुण्यातील शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) मंगलदास बांदल (Bandal Mangaldas) यांना उमेदवारी जाहीर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe), अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि मंगलदास बांदल अशा तिरंगी लढतीमुळे येथील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, वंचितने अचानक बांदल यांची उमेदवारी रद्द केली आहे.

चारच दिवसापूर्वी वंचितने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात शिरूरमध्ये वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मंगलदास बांदल यांनी काल शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यानंतर वंचितने मोठा निर्णय घेत शिरूर लोकसभेची बांदल यांची उमेदवारी रद्द केल्याचे जाहीर केले आहे. (Shirur Lok Sabha Election 2024)

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार,
बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा जो निर्णय वंचितने घेतला,
त्या विरोधात मंगलदास बांदल गेले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने त्यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द केली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर (Rekhatai Thakur) यांच्या सूचनेनुसार ही उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन