कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

शिक्रापुर – शिरुर येथे चारचाकी वाहनातून देशीदारूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई करीत दहा बॉक्‍ससह चारचाकी जप्त करून सुमारे पाच लाख चोवीस हजार नउशे साठ रुपयाचा मुद्देमालासह एका जणांना शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबतीत शिरुर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शिरुर वरुन रांजणगाव येथे कारमधून अवैध दारू वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांनी तात्काळ पोलिस नाईक कुडेकर आणि पोलिस काॕ.मांडगे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिरुर मधील अबिंका हाॕटेल जवळ लक्ष ठेवून उभे असता.

शिरुर वरुन पांढरा रंगाची स्विप्ट कार (एमएच १२ क्यु आर५७३८) रांजणगाव कडे निघाली असता थांबून विचारपुस केल्यानंतर कार चालकाने समाधान कारण उत्तर न दिल्याने यावेळी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये विना परवाना 10 बॉक्‍स देशी दारू ज्यात ४८ बाटल्या त्याची किंमत सुमारे २४९६० रुपये तर स्विप्ट कार (एमएच १२ क्यु आर५७३८) अंदाजे किंमत पाच लाख अशा पाच लाख चोवीस हजार नउशे साठ मुद्देमालासह दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला. सदरील कारवाई पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कुडेकर, पोलिस काॕ.मांडगे यांनी केली.पुढील तपास उमेश भगत करतआहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like