कारमधून अवैध रित्या दारु वाहतूक, शिक्रापुर पोलिसांनी छापा टाकत घेतले ताब्यात

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथून चारचाकी वाहनातून देशी, विदेशी दारूची वाहतूक करणारा एकाला राञी शिक्रापुर पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात. हा छापा टाकत दारूचे तब्बल सतरा बॉक्स आणि चारचाकी गाडी सह सुमारे पाच लाख छपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला

या बाबतीत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सणसवाडी ता. शिरूर येथून एक इसम चारचाकी गाडीतून दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हानंद पोवार, संदीप जगदाळे, अविनाश पठारे, विकास मोरे यांसह आदींनी सणसवाडी येथे जात सापळा रचला असता त्यांना एम एच १२ आर एफ ३३०८ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आतमध्ये दारूचे बॉक्स घेऊन आल्याची आढळून आली.

त्यावेळी पोलिसांनी गाडी आडवून कारची पाहणी केली असता कार मध्ये देशी, विदेशी दारूचे सतरा बॉक्स असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी स्विफ्ट कारसह दारूच्या बॉक्स अशा साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सदर कार चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विनोद यादव असल्याचे सांगितले, त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदर दारू सणसवाडी येथीलच अमोल हंबीर याचेकडून आणले असल्याचे सांगितले.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक ब्रम्हानंद पोवार रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.शिक्रापूर पोलिसांनी विनोद आप्पा यादव रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे व अमोल हंबीर रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.