… म्हणून शिवसेना न्यायालयात लढणार, काँग्रेसचा ‘हा’ नेता वकिली करणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी आवश्यक तसा पुरेसा वेळ दिला नाही अशी खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आता शिवसेना याविरोधात न्यायालयात जाणार असे सांगण्यात येत असून ही शिवसेनेची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल न्यायालयात मांडणार अशी शक्यता आहे. शिवसेना यासाठी कपिल सिब्बल यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी काँग्रेस नेता न्यायालयात लढणार हे चित्र दिसू शकते.

राज्यातील सत्तास्थापनेवरुन दर मिनिटाला नवनव्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रित केले. तत्पूर्वीच आता राष्ट्रपती राजवटीची तयार करण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेला राज्यपालांकडून मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती परंतू राज्यपालांनी ही मुदत नाकारली. त्यामुळे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेलेली शिवसेना आपल्याला मुदत वाढवून मिळाली नाही यामुळे न्यायालयात जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी रात्री 8.30 पर्यंत मुदत दिली आहे. राज्यपालांकडे शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी 3 दिवसांची मुदत मागितली होती. परंतू राज्यपालांनी याला अनुमती दिली नाही. त्यामुळे शिवसेना न्यायालयात जाऊ शकते. न्यायालयात शिवसेनेची बाजू काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल मांडणार आहे.

Visit : Policenama.com