पाठीशी शिवसेना असताना इतरांची मनधरणी का ? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेत भाजपची सत्ता आली त्यानंतर आता लोकसभा उपाध्यक्षपदावरून वाद सुरु आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्षपद देणार अशी चर्चा आहे. मात्र रेड्डी यांनी उपाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यावर शिवसेनेने त्यांचे मनोगत व्यक्त केले.

जगनमोहन रेड्डीला लोकसभा उपाध्यक्षपदाची ‘ऑफर’ देण्यात आली, पण जगन यांनी भाजपला काही अटी घातल्या. अटी-शर्ती पूर्ण झाल्या तरच लोकसभेचे उपाध्यक्षपद स्वीकारू, असे उत्तर त्यांनी भाजपला दिले. त्यावर जगन यांच्या इतके मागे लागण्याची गरज आहे काय? असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे. असं म्हणत शिवसेनेनं लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा केला आहे.

यंदा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधील भाजपा खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी YSR, शिवसेना की BJD या पक्षांच्या नेत्यांची चर्चा आहे. त्यावर शिवसेनेनं एखादे ओम बिर्ला एन.डी.ए.मधूनही उपाध्यक्षपदासाठी शोधायला हवेत, असं म्हणत लोकसभा उपाध्यक्षपदासाठी इच्छा बोलून दाखविली.

लोकसभेत भाजपनंतर सर्वाधिक खासदार शिवसेनेचे आहे. शिवसेना आपला उपाध्यक्ष बनू पाहत आहे. मात्र भाजप एनडीए बाहेरच्या पक्षाला पद देण्याबाबत विचार करत आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे १८ खासदार असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने आता पळत्यांच्या मागे फार लागू नये. संसदेत बहुमत आहे, पाठीशी शिवसेना आहे. मग इतरांची मनधरणी का करायची? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. तर लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यामुळे उपाध्यक्षपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वत्र आहे.

आरोग्यविषयक वृत्त –
बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like