देवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का ? संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची एका हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली होती. यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आली आहे. यावर आता खुद्द संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत भेट गुप्त नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणे काय अपराध आहे का ? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यतील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणे म्हणजे अपराध नाही आहे. मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो. दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटू शकतात. चर्चा करू शकतात. शरद पवार यांची मुलाखत घेतली होती, तेव्हाच देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी आणि अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असल्याचे जाहीर केले. असे राउत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारविरोधात टीका होत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतरही ठाकरे सरकारची कोंडी करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने काही राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like