शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांची नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची भेट, केली पाहणी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आज (2 नोव्हेंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद (धाराशिव) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करणे संदर्भात आढावा बैठक उस्मानाबाद चे पालकमंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत खरीप पिकांचे अतिवृष्टी हा निकष न धरता अवेळी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना सरसकट पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. तसेच ७ बारा व ८ अ ची अट शिथिल करण्यात यावी अशा सक्त सूचना देण्यात आल्या.

तसेच सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी रजा रद्द करून या संकटात बळी राज्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावे. जिल्यातील सर्व मंडळामद्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने सर्व पिके वाया गेली आहेत. त्यामुळे पूर्ण शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळेल अश्या प्रकारे पंचनामे करावेत व एकही शेतकरी या मदतीपासून व पिकविम्यापासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश पालकमंत्री यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे मॅडम, खासदार ओमदादा राजेनिंबाळकर, आ.ज्ञानराज चौगुले, मा. आ. ज्ञानेश्वर तात्या पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी घाडगे, जि प मुख्य अधिकारी कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी, तसेच उस्मानाबाद, कळंब, भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, उमरगा, लोहारा, औसा, निलंगा व बार्शी या सर्व तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा व तालुकास्तरावरील विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

Visit : Policenama.com