छगन भुजबळांविरोधात शिवसेनेनं दिला ‘हुकमी एक्का’ ! निकालाचं समीकरण बदलणार का ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवस चर्चा होती की, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत जाणार आहेत. परंतु अखेर याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचं त्यांनी स्वत:च सांगितलं होतं. शिवसेनेनं तर या मतदारसंघातून आपला उमेदवारही जाहीर केला आहे. संभाजी पवार यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येवल्यात छगन भुजबळ विरुद्ध संभाजी पवार असा सामना रंगताना दिसणार आहे. येवला हा भुजबळांचा मतदारसंघ आहे.

येवल्यामध्ये 2004 पासून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचा गड राखला आहे. जर यंदाच्या म्हणजेच 2019 च्या विधासभा निवडणुकीतही जर छगन भुजबळ विजयी झाले तर या जागेवर सलग 4 वेळा निवडून येणारे नेते ठरतील. आगामी विधानसभेच्या तोंडावर अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. शिवसेनेचे संभाजी पवार आणि छगन भुजबळ यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

येवला हा मतदारसंघ नाशिकपासून 73 किमी अंतरावर आहे. 2011 चा आकडेवारीनुसार या मतदारसंघात 271146 लोकसंख्या असून हा विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्हा आणि दिंडोरी लोकसभा क्षेत्रात येतो. हातमाग उद्योगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवल्यात एक हजाराहून अधिक हातमाग केंद्रे आहेत. येवल्यात रेशीम साड्या, गांधी टोप्या आणि पितांबर बनवलं जातं.

Visit : Policenama.com