देवेंद्र फडणवीस ‘मावळते मुख्यमंत्री’, ‘सामना’तून टीकेचा ‘बाण’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची धमकी देत असतानाच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भाजपने एकाला चलो ची भूमिका घेतल्याची माहिती मिळत असून शिवसेना सोबत आली नाही तर भाजप सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र आता त्यानंतर सामनामधून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली असून आज सामनाच्या अग्रलेखामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘मावळते मुख्यमंत्री’ म्हणून केले आहे. त्यांच्यावर टीका करताना पुढे लिहिले आहे कि, दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्र्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पॉल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलांवरच राज्याची पुढील दिशा ठरणार असल्याचे म्हटले आहे. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची !” असे म्हणत फडणवीसांवर तिखट बाण सोडण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत ठरल्याप्रमाणे शिवसेना अर्ध्या अर्ध्या सत्तावाटपार ठाम असून भाजपने मात्र त्यांना अजूनही काहीही ऑफर दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनाचा प्रश्न जटिल झाला असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात
बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढील काही दिवस जातील. मात्र हि कसरत म्हणजे दिल्लीच्या धुक्यात विमान उतरवण्यासारखे आहे. एका बाजूला अमित शहा आणि तर दुसऱ्या बाजूला सोनिया आणि शरद पवार चर्चा करत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यात नवीन सरकार स्थापन होईल. मात्र सत्तास्थापनेचा घोळ घालायचा आणि कारभार एकहाती ठेवून कारभार हाकायचा हे घटनाविरोधी असल्याचे या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.

Visit : Policenama.com