Shivsena Chandrakant Khaire on BJP Kirit Somaiya | “किरीट सोमय्या म्हणजे शक्ती कपूर”; शिवसेनेच्या माजी खासदाराचंं सोमय्यांवर टीकास्त्र!

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Chandrakant Khaire on BJP Kirit Somaiya | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी अटक केल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शनिवारी रात्री 10 वाजता राणा यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिथे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला मात्र यावरून शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Shivsena Chandrakant Khaire on BJP Kirit Somaiya) यांनी सोमय्यांवर टीका करताना त्यांना शक्ती कपूर (Shakti Kapoor) असं म्हटलं आहे.

 

किरीट सोमय्या हे डायलॉगबाजी करत असून ते शक्ती कपूर आहेत. सोमय्यांवर हल्ला झाला तर त्यांना दहा ठिकाणी फिरण्याची काय गरज आहे?, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यासोबतच सोमय्यांना स्टंटबाजी करायची सवय असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले.

 

रवी राणा यांना किरीट सोमय्यांना खार पोलीस स्टेशनमध्ये (Khar Police Station) भेटायला गेले होते.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हे समजताच त्यांनी घोषणाबाजी सुरू करत सोमय्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर चप्पला आणि बाटल्या फेकल्या.
यामध्येच सोमय्या यांच्या गाडीची काच फुटल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यावर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा (Z Security) असून त्यांनी आपण पोलीस ठाण्यामध्ये येणार असल्याचं कळवलं होतं.
तरीही त्यांच्यावर हल्ला होतो त्यामुळे याला पोलिसांचं समर्थन होतं किंवा पोलीस हे नाकाम झाले आहेत,
असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

Web Title :- Shivsena Chandrakant Khaire On BJP Kirti Somaiya | shiv sena leader chandrakant khaire compares bjp leader kirit somaiya to actor shakti kapoor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Symptoms Of Depression In Women | महिलांमधील ‘हे’ आहेत डिप्रेशनची लक्षणे; जराही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

 

Teeth Whitening | पिवळेपणा दूर करुन दात चमकदार आणि मजबूत करण्यासाठी ‘या’ आहेत 5 गोष्टी; जाणून घ्या

 

Pune Crime | स्क्रॅप व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत मागितली दीड कोटीची खंडणी, पुण्यातील कोंढवा येथील प्रकार