Shivsena Chandrakant Khaire | चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटाला इशारा; म्हणाले – ‘मुंबईतील शिवसैनिक मार खातील, जेलमध्ये जातील पण…’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Chandrakant Khaire | बंडखोर आमदारांना (Rebel MLA) खोक्याने पैसा देण्यात आला आहे म्हणूनच ते प्रति शिवसेना भवन बांधून आम्ही शिवसैनिक (Shiv Sainik) असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी बांधलेल्या शिवसेना भवनाची (Shivsena Bhavan) विटंबना शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीत. मुंबईतील शिवसैनिक हे कदापी सहन करणार नाही. मार खावा लागला किंवा जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला दिला आहे. (Shivsena Chandrakant Khaire)

 

शिंदे गटाकडे कोट्यवधी रुपये आले कुठून?
चंद्रकांत खैरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी आणि हिंदुंना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना भवनाची उभारणी केली. शिंदे गटाकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? सर्व पैशाने करायला लागलेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना भवन बांधले ते आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच भवनातून आमदार, खासदार (MLA, MP) झाले. शिवसेना भवनाची प्रतारणा करू नका. मुंबईतील शिवसैनिकांना हे सहन होणार नाही. ते आंदोलन करतील, मार खातील, जेलमध्ये जातील. त्यांची सहनशक्ती संपत आली आहे. (Shivsena Chandrakant Khaire)

 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिंदे गटात (Shinde Group) जे आमदार गेलेत त्यांना मराठवाड्यात आम्ही आडवे करू.
अंबादास दानवे यांच्यासोबत आम्ही काम करू. संजय शिरसाटांची शिवसेनेत येण्याची इच्छा मान्य करणार नाही.
रात्री कुठल्या धुंदीत ते बोलले असतील माहिती नाही. 1992 मध्ये ते शिवसेना सोडून गेले तेव्हा बाळासाहेबांवर एकेरी भाषेत टीका केली होती.
त्यांना परत घेण्यात आले त्यावेळी आमचा विरोध होता. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ.

Web Title :- Shivsena Chandrakant Khaire | shiv sena ex aurangabad mp chandrakant khaires warning to the eknath shinde rebel group mla

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

 

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा