‘चुकीच्या लोकांसोबत गेल्याचं मला दु:ख’, उद्धव ठाकरेंकडून युती तुटल्याचे संकेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चुकीच्या लोकांसोबत गेलो याचं मला दु:ख आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच. मी दिलेलं वचन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच असंही ते म्हणाले. बहुमत नसतानाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात आमचं सरकार येणार. हे सरकार कसं येणार ? असा सवालही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असेल याबाबत ठरलं होतं. मुख्यमंत्र्यांनीही जबाबदारी आणि पदांचं समान वाटप होईल असं जाहीर केलं होतं. मग मुख्यमंत्री पद का नाही ? मुख्यमंत्रीपद ही जबाबदारी नाही का ?” असा सवाल ठाकरेंनी केला आणि फॉर्म्युला ठरला नसल्याचा फडणवीसांचा दावा त्यांना खोडून काढला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “येत्या काळात शिवसेनेसमोर इतर पर्यायही उपलब्ध आहेत. मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की, माझ्यावर खोटेपणाचा आरोप लावला. आमच्यात काय ठरलं आहे पूर्ण जनतेला माहिती आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्यासाठी मी काही लाचार नाही.” असा घणाघातही त्यांनी केला.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके