Shivsena | पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात अडकलेल्या ’खोके’ सरकारला शेतकर्‍यांची दैना दिसेल काय? शिवसेनेचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीत शेतकर्‍यांची स्वप्न वाहून गेली, मात्र मिंधे सरकारला शेतकर्‍यांची ही दैना दिसेल काय? पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई अद्याप का मिळाली नाही, असा सवाल शिवसेनेने (Shivsena) आपले मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government)  विचारला आहे. राज्यातील शेतकरी संकटात असून दिवाळीपूर्वी घोषणा झालेली मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या (Farmer) बँक खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा होता पण अद्यापही अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना मदत मिळालेली नसल्याने शिवसेनेने (Shivsena) राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

 

शेतकर्‍यांची कैफियत मांडताना शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे की, निकषात न बसणार्‍या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने दसर्‍यापूर्वी घेतला. अतिवृष्टीग्रस्त (Heavy rainfall) शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी शासनाचे विहित नियम आहेत. मात्र, या नियमात न बसणार्‍या राज्यातील सहा लाख शेतकर्‍यांना 755 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय विशेष बाब म्हणून गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत (Cabinet Sub-Committee meeting) घेण्यात आला. जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे. मात्र, सरकारच्या केवळ घोषणा होत आहेत, यासंदर्भात प्रत्यक्ष मदत कधी मिळणार.

 

आधी मान्सूनला विलंब झाला म्हणून दुबार पेरणीवर खर्च करावा लागला. त्यानंतर ढगफुटीसारखा पाऊस होऊन अनेक वर्षे खपून संगोपन केलेली शेती पुराच्या पाण्याने खरवडून नेली. त्यात परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला उरलासुरला घासही हिरावून घेतला. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई कुठल्याही परिस्थितीत पोळ्यापूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करू अशी गर्जना राज्यातील ’मिंधे’ सरकारने केली होती. पोळा होऊन दीड महिना झाला तरी अजून कागदी घोडेच नाचवले जात आहेत. पोटनिवडणुकीच्या (By-Elections) व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ’खोके’ सरकारला शेतकर्‍यांची ही दैना दिसेल काय?

सामनात पुढे म्हटले आहे की, यंदाचा पावसाळा राज्यातील शेतकर्‍यांच्या मुळावरच उठला आहे. आधी जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने शेती बरबाद केली. या धक्क्यातून शेतकरी अजून सावरले नसतानाच आता परतीच्या पावसानेही शेतकर्‍यांचा मोठा घात केला. गेले 10-12 दिवस राज्याच्या सर्वच भागात पावसाचे धुमशान सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने भयंकर धुमाकूळ चालवला आहे. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीतून जी काही थोडीफार पिके वाचली होती ती आता हाता-तोंडाशी आली होती. मात्र, सुगीचा हंगाम सुरू झाला असतानाच राज्यभर सर्वत्रच ढगफुटीसारखा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले.

 

राज्यात यंदा सर्वाधिक पेरा झाला तो सोयाबीनचा. मात्र, सोयाबीनचे हेच पीक आता पुरते नष्ट झाले आहे.
परतीचा पाऊस एरवी रब्बी हंगामासाठी तसा उपयुक्त ठरत असतो. पण यंदा तो विध्वंसक बनून आला.
परतीच्या सरी एक-दोन दिवस कोसळतील आणि पाऊस निरोप घेईल असे वाटत होते,
मात्र निसर्गाच्या लहरीपणाने कहरच केला. सलग दुसर्‍या आठवड्यातही सातत्याने पाऊस सुरूच आहे.
पुन्हा पावसाचे थैमानही इतके राक्षसी आहे की शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे.

सततच्या या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना शेतात पाऊलही ठेवता येत नाही. डोळ्यासमोर शेतातील पिकांची नासाडी होत
असताना मिळेल ते वाचवण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतात पाऊल ठेवले
तरी गुडघाभर चिखलात पाय रुतून बसत असल्याने शेतकरी वर्गावर बिकट परिस्थिती ओढवली आहे.
ही भयंकर स्थिती विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दिसते आहे. शेतात उभ्या असलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकांचे जे
अतोनात नुकसान डोळ्यासमोर दिसते आहे ते शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारे आहे, असे सामनामध्ये शिवसेनेने म्हटले आहे.

 

Web Title :- Shivsena | eknath shindhe government only danced and paper work for poor farmers will farmers see their plight shivsena asked about farmer and heavy rain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दांडेकर पुल परिसरात दोन टोळक्यात राडा; 16 जण ताब्यात

Police Recruitment | राज्यात पोलीस भरती होणार; 11 हजार 443 पदे भरली जाणार

ST Fare Hike | सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी, दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ