home page top 1

खातेवाटपाबाबत शिवसेना समाधानी : संजय राऊत

मुंबई : वृत्तसांस्था – यंदाच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युती झाल्यामुळे राजकीय समीकरने बदलली. यंदा पुन्हा सत्तेत भाजप सरकार आले पण युती झालेल्या शिवसेनेनेला मात्र पुन्हा तेच अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र या चर्चांना शिवसेनेने फोल ठरवले आहे. आम्ही पूर्ण समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

खाते वाटपाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “मंत्रिमंडळात शिवसेनेला अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आलं आहे. या खातेवाटपात शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळालेली नाही. या सगळ्यावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत.

मात्र या नाराजीच्या सगळ्या चर्चांना काहीही अर्थ नाही या चर्चा फक्त प्रसारमाध्यमं घडवून आणत आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. तसेच आम्हाला जो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही मुळीच नाराज नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. गुरूवारी ते दिल्लीत दाखल झाले होते. आता आज ते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

Loading...
You might also like