परिचारिका ते महापौर ! मुंबईच्या ‘मेयर’ बनलेल्या पेडणेकरांचा प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या नव्या महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी यावेळी झालेली निवडणूक तब्बल 50 वर्षांनी बिनविरोध झाली आहे. किशोरी पेडणेकर या एक निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

परिचारिका ते महापौर
किशोरी पेडणेकर यांचा जन्म एका गिरणी कामगाराच्या घरात झाला होता. विवाहानंतर न्हावाशेवा इथल्या रुग्णालयात त्या परिचारीका म्हणून सुरुवातीला काम करत होत्या. महापालिका रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून सेवेत असणार्‍या पेडणेकर यांनी या सेवेचा राजीनामा देत 2002 मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. नंतर 2007 मध्ये आरक्षणामुळे त्यांना संधी मिळाली नाही. परंतु 2012 आणि 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग दोनदा त्या निवडून आल्या. पेडणेकर यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. पक्षाने त्यांच्यावर महिला विभाग संघटकाची जबाबदारी सोपवली होती.

विधानसभा निवणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. आक्रमक आणि निष्ठावान नगरसेवक म्हणून महापालिकेत त्यांची एक वेगळी ओळख आहे. म्हणून महापौर पद महिलेसाठी आरक्षित नसतानाही किशोरी यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली.

Visit : Policenama.com