शरद पवार समजून घ्यायला ‘त्यांना’ 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील. त्यांचा अनुभव दांडगा आहे असं विधान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपाला विचारा असं शरद पवार म्हणाले होते. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘शरद पवार हे काहीही चुकीचं बोलले नाही. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल, म्हणूनच पवार असं म्हणाले. ज्या लोकांना महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन व्हावं, असं वाटत नाही ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. मोदी-शहा समजून घेण्यासाठी तुम्हाला 25 जन्म घ्यावे लागलीत, असं भाजपच्या एका नेत्याने मला म्हटलं होतं. आता मी यांना म्हणतो की शरद पवार समजून घेण्यासाठी तुम्हाला 100 जन्म लागतील.’

काय म्हणाले होते शरद पवार –

सरकार स्थापनेबद्दल भाजप-शिवसेनेला विचारा. भाजप-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यांना त्यांचा मार्ग निवडायचा आहे. आम्ही आमचे राजकारण करु.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like