‘सोमय्यांचं तिकीट कापण्यात शिवसेनेचा दबाव नव्हता’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपा शिवसेनेच्या भांडणात किरीट सोमय्यांचा बळी गेला असं मला वाटत नाही. त्यांचं तिकीट कापण्यात शिवसेनेचा काही दबाव होता असं मला वाटत नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की, भाजपा शिवसेनेच्या भांडणात किरीट सोमय्यांचा बळी गेला नाही का ? किरीट सोमय्या यांचं तिकीट कापण्यात शिवसेनेचा दबाव नव्हता का ? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटत नाही की सोमयांचं तिकीट कापण्यात शिवसेनेचा काही दबाव होता. शिवसेनेची काही लोकं आम्हाला भेटली होती. त्यांनी मी समजावून सांगितले होते. आपण यापूर्वीच ठरवलं आहे की, जे गेलं ते विसरायचं आणि पुढे निघून जायचं. कोणीही कोणाचे वैयक्तीक शत्रू नाहीत. त्या-त्या वेळच्या परिस्थिती अनेकदा आपण निवडणुकांमध्ये आक्रमक विधानं करत असतो. त्यावेळी बऱ्याचदा चुकीची विधान आपल्याकडून केली जातात. जरी अशी विधानं केली तरी ती खरी आहेत असे समजून ती मनाला लावून घेतली नाही पाहिजेत आणि ते मनाला लावून घेणं योग्यही नाही.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘सोमय्यांची वक्तव्ये अशी नव्हती त्यांचं तिकीट कापावं’

किरीट सोमय्यांवर स्तुतीसुमनं उधळताना मुख्यमंत्री म्हणाले की, “किरीट सोमय्या प्रभावी आणि जमीनीवरील नेते आहेत. उत्तम लोकप्रतिनिधी आहेत. अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या. काहींमध्ये ते हारेल काहींमध्ये ते जिंकले. त्यांची अशी काही वक्तव्ये होती ज्यावर शिवसेनेचा असंतोष होता. परंतु या सगळ्या गोष्टी अशा नाहीत की त्यांचं तिकीट कापावं. पक्षावेळी वेळोवेळे वेगेळे निर्णय घ्यावे लागतात काहींनी वेगळी जबाबदारी मिळते. काहींना निवडणुकीची जबाबदारी मिळते. त्या हिशोबाने आम्ही हा निर्णय घेण्यात आला आहे. किरीट सोमय्यांसारखा आमचा एक नेता जास्त वेळ सिस्टीम बाहेर राहू शकत नाही. त्यांना यापेक्षा चांगली जबाबदारी मिळेल.”