HomeराजकीयLockdown बाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावरून संजय राऊतांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

Lockdown बाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावरून संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी कोरोनाचा कहर दिसून आला. यंदाही त्याचा कहर अधिकच गडद होत आहे. यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकारने कडक निर्बध लागू केले. देशातील कोरोनाचा वाढता आकडा पाहता देशातही लॉकडाऊन बाबत चर्चा सुरु आहे. या कारणावरून केंदीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले कि, लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेच्या मुलाखती दरम्यान म्हटलं होत. या शाह यांच्या विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रचार करुन ते आता दिल्लीत आले असतील. जर त्यांना घाईत लॉकडाउन करण्याची गरज नाही असं वाटत असेल तर जी माणसं मरत आहेत, ऑक्सिजन तसंच बेडशिवाय तडफडत आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना असतील तर जाहीर कराव्यात. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. त्यावेळी ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच, अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान २ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!,” असं ट्विट करत त्यांनी मागणी केली आहे.

दरम्यान, केंद्राकडून तत्परता दाखवली जात नाही, असं नाही. हे खरं नाही. मुख्यमंत्र्यांसोबत २ बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांना मी सुद्धा उपस्थित होतो. लसीकरणाबाबत वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. करोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. करोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठिण आहे. मात्र, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू, असे अमित शाह म्हणाले होते.

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News