Shivsena | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोठी घोषणा

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका (Uttar Pradesh Assembly elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच आता शिवसेनाही (Shivsena) राज्यातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपवरही (BJP) गंभीर आरोप करण्यात आले.

या बैठकीत शिवसेनेने आरोप केला आहे की, भाजप सरकारच्या (BJP government) शासन काळात राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था (Law and order) पूर्णपणे फेल झाली असून महिलेलाही असुरक्षित आहेत. दारुलशफा येथे झालेल्या या बैठकीत राज्याचे प्रमुख ठाकूर अनिल सिंह (Thakur Anil Singh) म्हणाले, उत्तर प्रदेशातील योगी सरकार (Yogi government) ब्राह्मणांबरोबर योग्य पद्धतीने वागत नाहीत. तसेच राज्यातील वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेची स्थितीही अत्यंत खराब आहे. एवढेच नाही, तर बेरोजगारी आणि महागाईनेही जनता त्रस्त झाली आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

सी-व्होटरनुसार भाजप आघाडीवर

देशात पुढील वर्षी पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात उत्तर प्रदेश हे सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एका वृत्तवाहिनाचा सी-व्होटरने उत्तर प्रदेशात सर्व्हे केला. यानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय समाजवादी पक्षाला 109-117 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बीएसपीला 12 ते 16 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 3 ते 7 जागा आणि इतरांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Vijay Rupani | … म्हणून विजय रूपाणींना गमवावे लागले मुख्यमंत्रीपद; PM मोदींच्या कार्यक्रमातही होते उपस्थित

Pune Crime | 2 कोटीचं फसवणूक प्रकरण : पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर, दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल; कार्यालयात बोलावून मारहाण करुन केला पाय फ्रॅक्चर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Shivsena | shivsena says will fight all 403 seats uttar pradesh assembly election 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update