‘रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवा’ : खोतकरांच्या घरी शिवसैनिकांचे आंदोलन

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – शेकडो शिवसैनिकांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी अशी या शिवसैनिकांची मागणी आहे. यासाठी त्यांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

दानवे आणि खोतकर वाद मिटवण्यासाठी आजवर अनेक बैठका पार पडल्या. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा काढण्यात यश आले नाही. एवढ्या बैठका होऊनही अद्याप जालन्यातून नेमकं काेण लढणार हा प्रश्न सुटला नसल्याचे दिसत आहे. यानंतर आता अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभेची निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिक त्यांच्या घरासमोर जमले आहेत. त्यांनी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी शिवसैनिक एकत्र आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच जालना येथे एका पुलाच्या भूमिपूजानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना, जालना लोकसभेची जागा मला सोडावी, मला तिथे निवडणूक लढू द्यावे असे थेट आवाहन अर्जुन खोतकर यांनी दानवेंच्या समोर केले होते.

ह्याहि बातम्या वाचा

‘..आणि आघाडीचे बारा वाजवणार’

‘वंचित बहुजन आघाडी भाजप-शिवसेना युती निवडून आणण्यासाठी पूरक’

बारामतीत टक्कर देण्यासाठी शेट्टी-जानकरांची गुप्त बैठक

आयआयटीत २५ मुलींना विषबाधा