धक्कादायक ! गुप्तांगावर मिरची पावडर टाकून विवाहितेला मारहाण

बाडमेर : पोलिसनामा ऑनलाइन – राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेच्या गुप्तांगात आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकण्यात आली. तसेच तिला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका विवाहित महिलेला शेजारील महिलेने डांबून तिला मारहाण केली. पुढे जात आरोपीने पीडितेच्या गुप्तांगावरती आणि डोळ्यात मिरची पावडर टाकली. पीडितेची मुलं धनाराम यांच्या घरासमोरून जात होते. तेव्हा धनाराम यांची पत्नी गजू देवी आणि मुलगी हेमा यांनी मुलांना थांबवून मारहाण केल्याचा प्रकार घडला. तसेच त्यांना तेथून हुसकावून लावले. मुलांनी घरी येत घडलेला सगळा प्रकार महिलेला सांगितला. तेव्हा ती जाब विचारण्यासाठी धनाराम यांच्या घरी गेली. या कारणावरून भडकलेल्या आरोपी महिलांनी पीडितेला मारहाण केली. तसेच पीडितेला रस्सीने बांधून मारहाण करत गुप्तांग आणि डोळ्यात मिरची पावडर टाकली.

दरम्यान, सदरील घटनेची माहिती मिळताच पीडित महिलेच्या पतीने तिथे पोहचत आरोपींच्या जाळ्यातून तिची सुटका केली. जखमी अवस्थेत पतीने पीडित महिलेला रुग्णालयात दाखल केलं. मागील ५ दिवसांपासून या महिलेवरती उपचार सुरु असून, या प्रकरणी पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

याबाबत बाडमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खीवसिंह भाटी म्हणाले, घडलेल्या प्रकरणावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पीडितेवरती रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरी धड टाकली असता आरोपी घरात नव्हते. सध्या ते फरार आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.