धक्कादायक! ऑफिसमध्ये घुसून पत्नीवर सपासप वार करत केला खून

भाईंदर : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईच्या भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आसून एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भाईंदर पश्चिम स्टेशन रोडवर असलेल्या वेंकेटेश्वर इमारतीमध्ये घडली आहे.

पतीने पत्नीच्या आफिसमध्ये जाऊन दरवाजातच तिच्यावर चाकूने भोकसून तिच्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नी वीणा भोईर ही सीए ऑफिसमध्ये काम करत होती. पतीने खून का केला हे अद्याप समजू शकले नाही. पत्नीचा खून करुन पतीने भाईंदर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली देत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.ऑफिसमध्ये हा सगळा प्रकार घडल्यामुळे इतर ऑफिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ऑफिसमध्ये हा सगळा प्रकार घडल्यामुळे इतर ऑफिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारात त्यांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तर घटनास्थळावरून वीणा हिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस आता घटनास्थळी चौकशी करत आहेत. तसेच पतीचीही आता कसून चौकशी सुरू आहे.