धक्कादायक वास्तव ! ‘असं’ असतं ‘पॉर्न स्टार’चं काम, शुटींगदरम्यान त्यांच्यासोबत घडतात ‘या’ गोष्टी ! वाचून येईल अंगवार काटा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्हाला असं वाटत असेल की, लैंगिक शोषण फक्त बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड अशा इंडस्ट्रीतच होत असतं तर तुम्ही चुकीचे आहात. कारण पॉर्न इंडस्ट्रीतही या गोष्टी होत असतात. आज पॉर्न स्टारच्या आयुष्यातील काही रहस्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील. अनेकदा शुटींगदरम्यान पॉर्न स्टारचं शोषणही केलं जातं. त्यांचा किती अडचणींना सामोरं जावं लागतं हे आपण जाणून घेणार आहोत.

https://www.instagram.com/p/BZVpzhMDD5_/

भारतात पॉर्न बॅन केलं आहे. अनेकांना पॉर्न पाहताना मजा येते परंतु त्यात काम करणाऱ्या स्टार्सला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. 35 वर्षीय पॉर्न स्टार मॅडिसन मिसिना (Madison Missina) हिनं एका मुलाखतीत अनेक चकित करणारे खुलासे केले आहेत. तिनं हेही सांगितलं आहे की, तिला शोषणाला सामोरं जावं लागलं आहे.

मॅडिसन म्हणाली, “योग्य शॉट देण्याच्या नादात अनेकदा आमच्या बॉडीचा जास्त वापर केला जातो. कधी कधी तर अनैसर्गिकपणेही वापर केला जातो ज्याचा खूप त्रास होतो. जास्त दु:ख याचंच आहे. याचाच परिणाम आमच्या अंडाशय आणि गर्भाशयावरही होतो. अनेकदा पॉर्न स्टारच्या गर्भाशयात गाठ निर्माण होते आणि शुटींगदरम्यान ती फुटतेही.”

https://www.instagram.com/p/BjRxWDpFrk5/

 

मॅडिसन म्हणते, “अशी काही घटना घडली आणि पॉर्न स्टारला त्याचा त्रासही होत असेल तर शुटींग मध्येच बंद करता येत नाही. कारण खूप वेळापासून सीन शुट केला जात असतो”असही ती म्हणाली.

मॅडिसन पुढे म्हणाली, “प्रत्येक ठिकाणी अशी माणसं आहेत जी महिलांची शक्ती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. पुरुषांचा अहंकार सांभाळला नाही तर आपलं करिअर नष्ट होईल असं महिलांना वाटत असतं. त्यांना दुखावलं तर आपल्याला ते वाळीत टाकतील, आपण एकटे पडू अशा भीतीनं महिला घाबरतात.” असंही मॅडिसन म्हणाली.