मधुमेह आणि अस्थिरोग निवारण शिबीरात रुग्णांना मिळाला ‘दिलासा’ – ‘आत्मविश्वास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि आई जगदंबा हेल्थ केअर सेंटर यांच्यावतीने दि. २ ते १० फेब्रुवारीपर्यंत मधुमेह आणि अस्थिरोग निवारण शिबीर आयोजित करण्यात आले होते. मेडिकल अ‍ॅस्ट्रॉलॉजर संजय कुलकर्णी काका यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीरात प्रत्येक रूग्णाची तपासणी, उपचार करण्यात आले.

सुप्रसिद्ध डॉक्टर मीनाक्षी पंडित यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे पंचवीस डॉक्टरांचे पथक सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरामागील गणेश सदन या ट्रस्टच्या वास्तूत नियोजनबध्दरितीने कामकाज झाले. रुग्णांची नांव नोंदणी, तपासणी व्यवस्था यात ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कर्मचारी वर्ग संपूर्ण वेळ कार्यरत होता. ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, उपाध्यक्ष सुनिलजी रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी शिबीर काळात पूर्णवेळ उपस्थित राहून नेटके संयोजन केले. सुमारे दोन हजार शिबीरार्थी होते.

ट्रस्टच्या उपक्रमांवर विश्वास असल्याने पुणे आणि पुण्याबाहेरून लोक उपचारासाठी आले होते. त्यामध्ये तरुण होते आणि ज्येष्ठ नागरिकही होते. समाजाच्या सर्व थरातून सहभाग झाला, त्यात नोकरदार, छोटे मोठे व्यापारी, पत्रकार, पोलीस अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते होते. गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी याने अनेक वर्ष त्रस्त झालेले रुग्ण होते आणि मधुमेहामुळे काळजीत असलेलेही हो can ccते. अनेक वर्ष मांडी घालून बसता आले नाही, फर्लiगभरसुध्दा चालता येत नाही अशा तक्रारी होत्या. थकवा, कंपवात, झोप न लागणे अशा समस्या पीडीतांनी कुलकर्णी काकांपुढे कळकळीने मांडल्या.

प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करीत काकांनी तपासणी केली. सहकाऱ्यांनीही प्रेमाने उपचार केले. काही रुग्णांवर दोन दिवस, सात दिवस, दहा दिवस उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा दिसू लागल्याने ओढीने रुग्ण परत परत आले. रुग्णांना दिलासा मिळाला, आपली प्रकृती सुधारू शकते असा आत्मविश्वास यातून शिबीरार्थीला मिळत गेला. अन्य गावांमध्ये ट्रस्टने पुढाकार घेऊन या पद्धतीचे शिबीर आयोजित करावे, अशा सूचना अनेकांनी केल्या. लोकांचा प्रतिसाद पाहून आणखी एकदा शिबीर भरविण्याचे ट्रस्टने ठरविले .

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने शिबीराचा प्रारंभ आणि समारोप संजय कुलकर्णी काका यांनी केला.