श्री.मंगेश रत्नाकर यांना जिल्हा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल व श्रीफळ

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ पुणे यांच्या वतीने जिल्हा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य सभागृह पुणे येथे वितरित करण्यात आला. यावेळी जय मल्हार हायस्कुल, जांबुत. तालुका शिरूर. जिल्हा पुणे.


या विद्यालयाचे कलाशिक्षक श्री मंगेश बबनराव रत्नाकर यांना जिल्हा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षण उपसंचालिका अनुराधा ओक महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संस्थापक हुसेन खान(चाचा), उपाध्यक्ष किरण सरोदे, महाराष्ट्र सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद शेलार, शिरूर कला संघाचे अध्यक्ष श्री प्रविण जगताप सर, आंबेगाव तालुका कला संघाचे अध्यक्ष -भानुदास बो-हाडे, अभिनेते संतोष पवार रिलॅक्सवेल मॅट्रेसेस कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट श्री दिनेश रत्नाकर, शिरूर पंचायत समितीचे मा.सदस्य वसुदेव जोरी, श्री शरद रत्नाकर.श्री.समीर दिघे, श्री तानाजी पवार उपस्थित होते.

याप्रसंगी डी. सी.एम.संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय एम.डी.शेवाळे साहेब,संस्थेचे ग्रामीण पर्यवेक्षक, श्री शिवाजीराव धायगुडे सर, मा.मुख्याध्यापक शितोळे सर, मुख्याध्यापक श्री.आर.एस.कापसे सर,पर्यवेक्षक श्री.फिरोदिया सर, सरपंच सौ.जयश्रीताई जगताप जांबुतगावचे ग्रामस्थ.यांनी अभिनंदन केले.या याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.