Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन काश्मीर येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

पुण्यासह जगभरात साजरा होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव काश्मीरमध्ये होत नाही. ही बाब लक्षात घेऊन हिंदुस्थानात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणार्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसह कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा आणि अखिल मंडई या मंडळांनी गतवर्षी काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या मंडळांनी ग्रामदेवता कसबा गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’चे संदीप कौल आणि सिशांत चाको यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानुसार काश्मीरमध्ये गणेश चतुर्थीला प्रथमच सार्वजनिकरित्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. दीड दिवसाने झेलम नदीत या बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती या ‘गणपतीयार ट्रस्ट’कडून देण्यात आली. तसेच पुण्यातील या मंडळांचे त्यांनी आभारही मानले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

‘‘काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला. या बाप्पाचे काल भावपूर्ण पद्धतीने विसर्जन करण्यात आले. या गणेशोत्सवामुळे काश्मीर भागात सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी, अशी मी श्री गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो.’’

पुनीत बालन Punit Balan (विश्वस्त व उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pune Kuswali Pathar | पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण होणार जागतिक पर्यटन केंद्र,
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्धार

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा
उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद

Maharashtra Politics |राज्यात राजकीय हालचालींना वेग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजपाचा प्लॅन बी तयार?, बावनकुळे म्हणाले…

PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई, 53 हजार 835 चौरस फूट बांधकाम जमिनदोस्त