Shrinath Bhimale BJP Coordinator Pune Lok Sabha | पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrinath Bhimale BJP Coordinator Pune Lok Sabha | भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ‘महाविजय २४’ या अभियानाच्या पुणे लोकसभा समन्वयकपदी महापालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते पुण्यात स्विकारले. (Shrinath Bhimale BJP Coordinator Pune Lok Sabha)

यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), विक्रांत पाटील (Vikrant Patil), प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pandey), शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), जगदीळ मुळीक (Jagdish Mulik) उपस्थित होते. (Shrinath Bhimale BJP Coordinator Pune Lok Sabha)

भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून २००२ पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांना ही जबाबदारी मिळाली आहे. शिवाय पुणे लोकसभेंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.

नियुक्तीबाबत भिमाले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis),
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil)
आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आणि पार्टीने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी
काळात सार्थ करण्याचा प्रयत्न आहे. पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकेल, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे. संघटनेत आजवर मिळालेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडली असून नवी जबाबदारीही पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेतून निभावली जाईल’.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन