…मात्र बायको स्वतःच नांदायला आली ; श्रीनिवास वनगाचा भाजप-सेनेला टोला

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघरच्या पोटनिवडणुकीत पराभव झालेले शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना – भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपा – शिवसेनेनेच हे भांडण नवरा बायको सारखे आहे. मात्र नवरी आता स्वतःच माझ्याकडे नांदायला आली आहे. अशी टीका त्यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदानही पूर्ण झालेले आहे, यादरम्यान २०१४ मध्ये पालघरमध्ये निवडून आलेले खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्याविरोधात भाजपने राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी पोटनिवडणुकीत गावित खासदारपदी निवडून आले. त्यानंतर शिवसेनेने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. मात्र ऐनवेळी भाजप खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. याचदरम्यान नाराज झालेल्या श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना – भाजपावर टीकास्त्र सोडले .

‘काही कारणास्तव रागवून बाहेर राहिलो, मात्र आता बायकोच आपणहून नवऱ्याकडे आली आहे. म्हणून मीच सांगितले, बाबा आता तूच संसार कर. भाजपा – शिवसेनेनेच हे भांडण नवरा बायको सारखे आहे. मात्र नवरी आता स्वतःच माझ्याकडे नांदायला आली आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना ‘जसे बाबांनी आमदार-खासदार असताना मोठी संपत्ती जमवून ठेवली नाही, तर तुमच्यासारख्या माणसांचे प्रेम-आपुलकी कमावली. बाबांमुळेच मला कानाकोपऱ्यात मान सन्मान मिळतो, हीच माझ्यासाठी मोठी संधी आहे. असे त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, ‘आधी मी पालघर जिल्ह्यामध्ये उद्धवजी सांगतील, ते काम करणार आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार आहे. मी मागे हटलेलो नाही. मी आमदारही होणार आहे आणि खासदारही होणार आहे. पण घाई नाही’ असेही त्यांनी म्हंटले.