मुलगी ‘पलक’सोबत श्वेता तिवारीची ‘बाँडिंग’, भावाच्या लग्नात ‘असं’ केलं ‘एन्जॉय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री श्वेता तिवारीचा भाऊ निधान तिवारी आणि यास्मीन शेख नुकतेच विवाहबद्ध झाले. या लग्नात मस्ती करताना श्वेतानं कुठेच कसर ठेवलेली नाही. श्वेतानं नुकतेच हळदी समारंभातील काही फोटो शेअर केले होते जे व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा तिनं काही लेटेस्ट फोटो शेअर केल आहेत. यात ती एन्जॉय करताना दिसत आहे.

श्वेता तिवारी आपल्या पर्सनल लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत असते. श्वेतानं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती भावाच्या लग्नाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

श्वेताच्या भावाचं लग्न गोव्यात झालं. श्वेता आपल्या दोन्ही मुलांसोबत लग्नाला गेली होती. श्वेता तिवारीनं अलीकडेच तिची मुलगी पलक तिवारी आणि होणारी वहिणी यास्मीन शेखसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत तिघीही खूप आनंदात पोज देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना श्वेतानं खास कॅप्शनही दिलं आहे.

श्वेतानं शेअर केलेल्या फोटोत मायलेकीची बाँडिंग पाहण्यासारखी आहे. दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. अनेक फोटोत श्वेता आणि पलक दोघी मायलेकी वहिणी यास्मीन शेखसोबत मस्ती करताना दिसत आहेत. श्वेताचे हे वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B9BOOI-BMw9/