Side Effects Of Drinking Excess Water | तुम्ही एका दिवसात 3 लीटरपेक्षा जास्त पाणी पिता का, तर जाणून घ्या शरीरावर होणारे याचे गंभीर परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Side Effects Of Drinking Excess Water | निरोगी राहण्यासाठी पाणी पिणे (Drinking Water) खूप गरजेचे आहे. त्यामुळे डिहायड्रेशन (Dehydration) होत नाही. पोटात साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होत नाही. त्वचा निरोगी राहते (Skin Stays Healthy). पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे (Benefits Of Drinking Water) आहेत. रोज किमान 2-3 लीटर पाणी प्यायला हवे असे तज्ज्ञ सांगतात, पण काही लोक असे आहेत जे दिवसातून 5-6 लिटर पाणी पितात. काही लोक मुरुम (Acne), त्वचेच्या समस्या (Skin Problems), कोरडेपणा (Dryness), वयोमानाची लक्षणे (Symptom Of Aging) कमी करण्यासाठी जास्त पाणी पिण्यास सुरुवात (Side Effects Of Drinking Excess Water) करतात.

 

अर्थात, पाणी प्यायल्याने त्वचेसोबतच (Water benefits for skin) शरीराचे अनेक अवयव निरोगी राहतात, त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडते, पण, जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याचे अनेक प्रकारचे नुकसान (Side Effects Of Drinking Excess Water) सुद्धा होऊ शकते.

 

जास्त पाणी पिण्याचे तोटे (Disadvantages Of Drinking Too Much Water)
फोर्टिस हॉस्पिटलचे (मुंबई) जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप शाह (Fortis Hospital General Physician Dr. Pradeep Shah) म्हणतात की, कोणत्याही वस्तूचे जास्त सेवन केले तर ते शरीरालाच हानी पोहोचवते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती एका दिवसात शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात करते तेव्हा फक्त नुकसानच होते.

 

साधारणपणे शरीराला दिवसाला 2 लिटर पाण्याची गरज असते. जास्तीत जास्त 3 लिटर पिऊ शकता. यापेक्षा जास्त प्यायल्यास वॉटर इन्टॉक्सिकेशन (Water Intoxication) किंवा वॉटर पॉयजनिंग (Water Poisoning) होऊ शकते. वॉटर इन्टॉक्सिकेशन ही एक स्थिती आहे जी जास्त पाणी प्यायल्यामुळे उद्भवते. यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे संतुलन (Electrolyte Balance) बिघडते.

डॉ. प्रदीप शहा सांगतात की, जास्त पाणी प्यायल्याने (Drinking Too Much Water) रक्तातील सोडियम धोकादायक अशा कमी पातळीवर पोहोचते,
ज्यात अनेकदा सौम्य लक्षणे तर काही वेळा गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.
मॅरेथॉन (Marathon), ट्रायथलॉनमध्ये (Triathlon) सहभागी होणार्‍या लोकांमध्ये त्याचा धोका जास्त असतो.

 

वॉटर इन्टॉक्सिकेशनच्या सौम्य लक्षणांमध्ये मळमळ (Nausea), उलट्या (Vomiting), डोकेदुखी (Headache),
भ्रम यांचा समावेश असू शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये, फेफरे, कोमा जाणे आणि मृत्यू होऊ शकतो.
शरीरातील अतिरिक्त सोडियममुळे मेंदू (Brain) आणि शरीराच्या पेशींमध्ये (Body Cells) सूज येते, ज्याला सेल्युलर स्वेलिंग म्हणतात.

 

मेंदूच्या पेशींमध्ये सूज आल्यास, व्यक्तीला भ्रम, तंद्री (Drowsiness), पेटके (Cramps),
स्नायू कमकुवत होणे (Muscle Weakness), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) इ. होऊ शकते.
जर एखाद्या व्यक्तीने 10 लिटर पाणी प्यायले तर रक्तातील सोडियमची पातळी (Sodium Level) आणखी कमी होते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.
यामुळे व्यक्ती कोमात जाऊ शकते, मृत्यूही (Death) होऊ शकतो.

दिवसातून किती पाणी प्यावे (How much water should you drink?)
दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.
जेव्हा तुम्ही दिवसातून 7-8 लिटर पाणी पिण्यास सुरुवात करता आणि नंतर एक किंवा दोन दिवस पित नाही, तेव्हा डिहायड्रेशन होऊ शकते.
यामुळे किडनी खराब (Kidney Damage) होऊ शकते, किडनी स्टोन (Kidney Stone) तयार होऊ शकतो.

 

Web Title :- Side Effects Of Drinking Excess Water | side effects of drinking excess water

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

 

Pune Crime | दीड हजार रुपये परत न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून; डेंगळे पुलाखालील नदीपात्रातील घटना, शिवाजीनगर पोलिसांकडून एकाला अटक

 

Maharashtra Assembly Speaker Election | राज्यपाल विरुद्ध ‘मविआ’ संघर्ष वाढणार?, ठाकरे सरकारचा ‘हा’ प्रस्ताव फेटाळला