Side Effects of Reheating Foods | ‘हे’ 9 फूड्स दुसर्‍यांदा गरम करून खाल्ले तर आरोग्याचे होईल मोठे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Side Effects of Reheating Foods | जेवणानंतर शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि नंतर गरम करून खातो. परंतु काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम केल्याने शरीराला धोकादायक (Side Effects of Reheating Foods) ठरतात, तसेच त्यांच्यातील पोषकतत्व नाहिसे होतात. कोणते खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाणे टाळले (foods that turn toxic when reheated) पाहिजे ते जाणून घेवूयात.

 

1. सेलेरी पुन्हा गरम करू नका
सेलेरी (Celery) मध्ये नायट्रेटची मात्रा जास्त असते. जर तुम्ही ती दोन ते तीनवेळा गरम केली तर ती टॉक्सिक होते. हे टॉक्सिक शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे.

 

2. अंडे (Egg) पुन्हा गरम करू नका
अंडे पुन्हा गरम केल्यातील यातील प्रोटीन नष्ट होतात. शिवाय शरीराचे गंभीर नुकसान होते. यातील नायट्रोजन पुन्हा गरम केल्याने ऑक्सीडाइज्ड होते, ज्यामुळे कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. (Side Effects of Reheating Foods)

 

3. बीट पुन्ह गरम करू नका
बीटची (beetroot) भाजी करत असाल तर ती पुन्हा गरम करू नका. यात नायट्रेट असते जे पुन्हा गरम केल्याने नष्ट होते.

 

4. भात पुन्हा गरम करू नका
एफएसएनुसार, भात (Rice) पुन्ह गरम करून खाल्ल्याने फूड पॉयजनिंग होऊ शकते.

 

5. मशरूम पुन्हा गरम केल्याने होते विषारी
मशरूममध्ये (mushroom) प्रोटीन खुप जास्त असल्याने पुन्हा गरम केल्याने त्यांची संरचना बदलते. जे शरीरासाठी हानिकारक आहे.

 

6. पालकची भाजी पुन्हा करू नका गरम
फ्रिजमध्ये ठेवलेली पालकची भाजी (palak vegetable) पुन्हा गरम करून खाणे टाळा यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यातील नायट्रेट तत्व पुन्हा गरम केल्याने हानिकारक होते. (Side Effects of Reheating Foods)

7. तेल करू नका वारंवार गरम
एकच तेल (Oil) वारंवार गरम करून वेगवेगळे पदार्थ तळणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान हृदयाचे होते. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते.

 

8. बटाटे वारंवार गरम केल्यास होईल हा आजार
बटाट्याची (potato) शिल्लक राहिलेली भाजी दोन ते तीनवेळा गरम करून खाल्ल्यास शरीरासाठी खुप नुकसानकारक आहे. यामध्ये बॅक्टेरियामुळे बोटूलिज्म पॉयझन तयार होते. जे शरीराच्या नर्व्हजवर अटॅक करते. श्वास घेण्यास त्रास, मांसपेशीमध्ये पॅरालिसीस, इतकेच नव्हे तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

 

9. चिकन, मशरूम सुद्धा करून नका पुन्हा गरम
चिकन (chikan), मशरूमची भाजी पुन्हा गरम केल्याने पाचनक्रियेचे नुकसान होते. शरीरासाठी धोकादायक आहे.

 

Web Title :- Side Effects of Reheating Foods | never reheat these 9 foods its toxic and dangerous for health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान मन्नतवर पोहचला पण ‘या’ कारणामुळं मुनमुन धमेचा तुरूंगातच अडकली, जाणून घ्या

Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्याच्या बालेवाडीत स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी; तब्बल पावणे दोन तासांनी अग्निशमन दलाला कळविली माहिती