Side Effects Previously Used Oil | कढईमध्ये उरलेल्या तेलाचा वारंवार वापर करताय?; मग थांबा, अन्यथा होईल दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Side Effects Previously Used Oil | सध्याच्या धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्यावर निंयत्रण असणे अथवा योग्य पद्धतीने खाण्याचे नियोजन असणे अतिशय महत्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत नियंत्रण बिघडले तर आरोग्याला बळी पडू शकता. त्यामुळे चुकीचा आहार घेणे आरोग्याला नुकसान पोहचू शकते. युवकांना लहान वयातच उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह (High Blood Pressure, Heart Disease And Diabetes) अशा आजाराला सामोरे जावे लागते. यामागे अनेकजण दुर्लक्ष करत असतात. मात्र त्याकडे लक्ष (Health Tips) देणे महत्वाचे आहे. (Side Effects Previously Used Oil)

 

खरंतर आहारामध्ये अनेक पदार्थ तळलेले असतात. समोसे, बटाटे वडे, पापड, पुऱ्या अशा तळलेल्या पदार्थाचा समावेश आहारात (Diet) असल्यास तुम्हाला अधिक लक्ष देणे आवश्यक असते. समजा तुम्ही रस्त्यावरील खाणे पसंद करत असल्यास त्यावेळी तुम्ही अनेक समस्याला देखील बळी पडू शकता (Healthy Living Tips). याचे महत्वाचे कारण म्हणजे, या ठिकाणी पदार्थ तयार करत असताना एकदा वापरलेले तेल सतत स्वयंपाकासाठी वापरत असतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी नुकसान पोहचवत असते. (Side Effects Previously Used Oil)

 

नेमकी समस्या काय होतेय (What Exactly Is The Problem) ?
कढईमध्ये उरलेले तेल पुन्हा वापरल्याने, त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. या फ्री रॅडिकल्सच्या वाढीमुळे शरीरामध्ये जळजळ होऊन अनेक प्रकारचे आजार होतात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आर्ट ऑफ इंडिया (Food Safety And Standards Authority of India (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळले पाहिजे. असं संशोधनात सांगितलं आहे.

ट्रान्स फॅट्स (Trans Fats) –
हे हानिकारक फॅट्स आहेत जे हृदयविकार वाढवू शकतात. पुन्हा वापरलेल्या तेलात ट्रान्स फॅटचे प्रमाण जादा असते.
सतत तेल गरम केल्याने कर्करोगाचे (Cancer) आजार होण्याची शक्यता वाढते.
या तेलाच्या सेवनाने कोलन कर्करोग, पित्ताशयाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग (Colon Cancer, Gallbladder Cancer, Liver Cancer)
आणि इतर प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे, स्वयंपाकाचे तेल पुन्हा वापरण्याआधी ते त्याचा विचार केला जाणे आवश्यक.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Previously Used Oil | do you also use previously used oil know the side effects Health Tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil on Sharad Pawar | ‘शरद पवारांवर टीका करणं ही देशात आणि महाराष्ट्रात फॅशन झालीय’ – जयंत पाटील

 

RBI Credit-Debit Card Rules | क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसंदर्भात RBI ची नवीन नियमावली जारी; जाणून घ्या

 

Devendra Fadnavis | राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘सत्तेच्या मस्तीत कसेही वागुन घ्या, पण…’