Sidharth Sharma | रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी गेलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूचे निधन

अहमदाबाद : वृत्तसंस्था – Sidharth Sharma | क्रीडाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला गेलेल्या क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. या युवा खेळाडूचे नाव सिद्धार्थ शर्मा असून तो हिमाचल प्रदेशचा युवा क्रिकेटपटू आहे. रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी गुजरातला गेला होता. मात्र त्या ठिकाणी तो आजारी पडला आणि त्याचे निधन झाले. (Sidharth Sharma)

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानेसुद्धा वेगवान गोलंदाज सिद्धार्थचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. सिद्धार्थ शर्मा अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता तेव्हा त्याने सामन्याच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या होत्या. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडोदरामध्ये रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. (Sidharth Sharma)

सिद्धार्थ शर्माची कारकीर्द

उना इथं जन्मलेल्या सिद्धार्थचे करिअर अवघे पाच वर्षांचं होतं.
त्याने आपल्या करिअरमध्ये एका T-20 सामन्यासह 6 प्रथम श्रेणीचे सामने खेळले होते. 6 लिस्ट ए सामन्यात त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आपल्या छोटेखानी कारकिर्दीतला अखेरचा सामना बंगालविरुद्ध कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळला होता.

Web Title :- Sidharth Sharma | ranji trophy himachal pradesh cricketer siddharth sharma died in gujrat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Accident News | महाबळेश्वरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात

Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

Pune Crime News | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; मुंढवा येथील खळबळजनक घटना