पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘या’ कारणामुळे ‘मौनव्रत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान तब्बल १५७ प्रकल्पांचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले. मात्र, लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच त्यांनी मौनव्रत धारण केले. मागील पाच दिवसांपासून त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन आणि जनतेशी संवाद साधणाऱ्या मोदींनी पाच दिवसांत काहीही केले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींचे मौनव्रत धारण करण्याच कारण आहे ‘होलाष्टक’. ‘होलाष्टक’ काळ सुरु झला आहे. हा काळ अशुभ मानला जातो व होळीच्या आदीचे आठ दिवस हे अनिष्ट मानले जातात.

होळी २१ मार्च रोजी आहे. तोपर्यंत मोदी मोठ्या जाहीर कार्यक्रमात बोलण्याची शक्यता नाही. भाजपने ३६ पक्षांसोबत युती केली आहे. सध्या जाहीरनाम्यावर काम सुरु आहे. प्रचाराच्या व्युहरचनेची जबाबदारी अरुण जेटली यांच्याकडे आहे. नरेंद्र मोदी वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने भेटत असून प्रचार मोहिमेला अंतिम रुप देत आहेत.

अथक परिश्रम करून ठरविलेले काम तडीस नेणारा नेता या भारतीयांच्या जनमानसात ठसलेल्या प्रतिमेचे मतांच्या रूपाने भांडवल करण्यासाठी भाजपाने निवडणुकीत ‘मोदी है तो मुमकीन है’ हे घोषवाक्य वापरायचे ठरविले आहे.

ह्याही बातम्या वाचा-

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’ 

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात 

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मशिदीमध्ये गोळीबार ; ६ जणांचा मृत्यु  

पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा 

You might also like