Mira Road Crime | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच केला 2 वर्षाच्या मुलीचा निर्घृण खून

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन – Mira Road Crime | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच (Mother’s Boyfriend) केली 2 वर्षाच्या मुलीची हत्या (Murder) केल्याची घटना मीरा रोड येथे (Mira Road Crime) उघडकीस आली आहे. दोघांतील अडसर दूर करण्यासाठीच मुलीचा अपघाती मृत्यूचा (Accidental Death) बनाव केला होता. दरम्यान पोलिसांनी प्रियकर आदिल खान Adil Khan (वय 22) याला अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूजा वाघ (Pooja Wagh) ही मुर्धा गावात आपल्या दोन वर्षांची मुलगी सोनालीसोबत (Sonali) राहत होती. त्या दोघी आदिल खान याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होत्या. पूजाने पहिला प्रेमविवाह (Love Marriage) केला होता. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली आहेत. दोघांचे पटत नसल्याने मोठी मुलगी वडिलांसोबत राहते तर पूजा लहान मुलीला घेऊन वेगळी राहात होती. ती कॅटरिंगचे काम करते तर आदिल हा रिक्षा चालवायचा.

पूजा कामावर गेली कि आदिल सोनालीचा सांभाळ करायचा. परंतु सोनाली सारखी रडते म्हणून आदिलने पूजाकडे तक्रार केली होती. दरम्यान बुधवारी सकाळी सोनाली हिचा घरी अपघाती मृत्यू झाल्याची खबर भाईंदर पोलीस ठाण्यात (Bhayander Police Station) मिळाली होती. महत्वाचे म्हणजे खेळात असताना सोनाली गॅस शेगडीवर पडली. त्यामुळे तिच्या नाका तोंडाला मार लागला. आदिल सोनालीला घेऊन रुग्णालयात आला. त्यावेळी डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगताच आदिलने तेथून पळ काढला. संशय आल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जोशी रुग्णालयात (Joshi Hospital) पाठविला. त्यानंतर मुलीचे तोंड व नाक दाबल्याने तिचा श्वास कोंडल्याचे तसेच डोक्याच्या मागे जखम असल्याचे निष्पन्न झाले. (Mira Road Crime)

 

पोलीस निरीक्षक मुगुट पाटील (Police Inspector Mugut Patil) यांनी आदिल याला तात्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच पूजा आणि आपल्यामध्ये सोनाली अडसर ठरत होती.
त्यामुळे तिचा खून केल्याची आदिलने कबुली दिली.
आदिलला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Web Title :- Mira Road Crime | murder of daughter by mothers lover accidental death revealed in investigation accused arrested marathi news

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा