फायद्याची गोष्ट ! दररोज 20 रुपये जमा करून मिळवा 86 लाख, अत्यंत कामाचा ‘हा’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या महागाईच्या जमान्यात आपल्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण करणे सामान्य माणसासाठी कठीण होऊन बसले आहे. अनेकवेळा आपण बचत करण्याचा विचार करतो, मात्र विविध कारणांसाठी ते खर्च होतात. बँकेत देखील एफडीवर व्याजदर कमी झाले असून आज आम्ही तुम्हाला एका नवीन योजनेविषयी माहिती देणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही दररोज 20 रुपये गुंतवणूक करून 86 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.

जाणून घ्या या योजेबद्दल –

तुम्ही म्यूचुअल फंडात दररोज 20 रुपये म्हणजेच महिन्याला 600 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 30 वर्षांनंतर 86 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी 18 टक्के व्याजदर मिळणार असून या हिशोबाने तुम्ही 30 वर्षात 86 लाख रुपये बचत करू शकता. तसेच कोणत्या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतवा मिळू शकतो याची देखील आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

अशाप्रकारे काम करते एसआयपी –

एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये पहिल्या महिन्यातील फायदा हा तुमच्या दुसऱ्या महिन्यातील फायद्यामध्ये पकडला जातो. त्यामुळे तुमची जास्त बचत होऊन तुम्हाला मोठा फायदा होतो. त्यामुळे एसआयपी मध्ये जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करून तुम्ही जास्त फायदा मिळवू शकता. नियमित गुंतवणुकीसाठी हा सर्वात सुरक्षित मार्ग असून यामध्ये तुम्ही 500 रुपये गुंतवणुकीपासून देखील सुरुवात करू शकता. त्यामुळे छोटी रक्कम गुंतवून तुम्ही मोठी बचत करू शकता.

SIP is best investment plan for how to become rich and earn great money

Visit : Policenama.com