कोट्याधीश भावाची बहिण उदरनिर्वाहासाठी करायची ‘धुणी-भांडी’चे काम, चोरीच्या आरोपामुळं मारहाण झाल्यानंतर मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आत्मसन्मान आणि स्वाभिमान म्हणून 44 वर्षाची महिला आपल्या कोट्याधीश असलेल्या भावांपासून वेगळी राहत होती, परंतू तिच्यावर चोरीचा आळ आला आणि जबर मारहाणीत तिला तिचा जीव गमवावा लागला. विधवा महिला तिच्या मुलांसह राहत होती आणि जीवनाचा गाडा ओढण्यासाठी घरोघरी जेवण बनवण्याचे काम करत होती. हे धक्कादायक प्रकरण दिल्लीतील महरौली भागात घडले.

मृत पावलेल्या मंजू गोयल या महिलेला तिच्या घर मालकाने चोरीच्या आरोपाखाली बेदम मारहाण केली आणि याच मारहणीत या 44 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

कोट्याधीश आहे भाऊ –
दिल्लीतील प्रसिद्ध जिंदल केटरर्सचा व्यवसाय हा महिलेच्या भावाचा आहे. असे असताना सुद्धा ही महिला आपल्या भावांकडून कोणतीही मदत घेत नव्हती. आत्मसन्माना पोटी ती भाड्याच्या घरात राहत होती. दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवून ती तिचा चरितार्थ चालवत होती. मंजूची मुले तिच्या सासरी रेवाडीमध्ये राहत होती, ही घटना शनिवारी घडली. महिलेच्या घर मालकाने तिच्यावर चोरीचा आरोप लावून तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर मंजूच्या भावांना बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले परंतू जास्तच जखमी असल्याने तिचा मृत्यू झाला.

महिला आणि तिच्या भावांमधील संबंध अत्यंत चांगले होते. बहिणीची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी अनेकदा तिला मदत देण्याचा प्रयत्न केला परंतू तिने आत्मसन्मानामुळे आपल्या भावांकडून कोणतीही मदत घेतली नाही. महिलेच्या मृत्यूनंतर भावांनी पोलिसात तक्रार दाखल केली. महरौली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आयपीसी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आणि घर मालक सतीश पहवा त्याची पत्नी, मुले यांना ताब्यात घेतले.

Visit : Policenama.com