रामायणच्या सीतेनं उघडलं ‘गुपित’, सांगितलं कॅमेर्‍याच्या मागे कास्ट ‘कसं’ करत होती काम

पोलिसनामा ऑनलाइन –रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतील अनेक किस्से समोर येताना दिसत आहेत. या मालिकेतील सीता म्हणजेच दीपिका चिखलिया हिनं याचा खुलासा केला आहे की, रामायणच्या शुटींग दरम्यान कॅमेऱ्याच्या मागे नेमकं काय काय होत असे.

दीपिका चिखलिया सध्या लाईमलाईटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. अलीकडेच दीपिकानं तिच्या ट्विटरवरून एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो रामायणच्या शुटींग दरम्यानचा आहे. या फोटोत रामानंद सागर रामची भूमिका करणारे आणि अरूण गोविल आणि सीता साकारणारी दीपिका चिखलिया दिसत आहे. त्यांच्या मागेही काही कलाकार उभे आहेत. कॅमेऱ्याच्या मागचा हा फोटो आहे.

फोटोत दिसत आहे की, रामानंद सागर अरूण आणि दीपिका यांना काहीतरी समजवताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक पुस्तकही दिसत आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये दीपिका म्हणते, “कॅमेऱ्याच्या मागे.”

या फोटोच्या माध्यमातून दीपिका सांगू इच्छित आहे की, कॅमेऱ्याच्या मागे काय काय घडत होतं. रामायणमधील शेअर केलेली ही जुनी आठवण दीपिकाच्या चाहत्यांनाही खूप आवडली आहे. सध्या हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.