गणेश ‘विसर्जना’साठी गेलेल्या 6 जणांचा ‘तलावात’ बडून ‘मृत्यू’

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – आज अनेक ठिकाणी पाचव्या दिवशी गणेश विसर्जन होणार होते. परंतू आजच्या गणेश विसर्जनाला गालबोट लागले. नंदुबारमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दुर्देवी घटना घडली. यात घटनेत गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वडछील गावामध्ये ही गंभीर घटना घडली.

गणपती विसर्जनासाठी तलावात उतरलेल्या हा या 6 तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासह असलेल्या इतर तरुणांनाही पोहता येत नव्हते, त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आवाज ऐकून तेथील स्थानिकांनी या तरुणांना वाचवण्याचे प्रयत्न केला. परंतू यश न आल्याने या तरुणांना तलावत बडून मृत्यू झाला.

विशाल मंगल चित्रकथे, कैलास संजय चित्रकथे, रविंद्र शंकर चित्रकथे, दीपक सुरेश चित्रकथे, सागर आप्पा चित्रकथे, सचिन सुरेश चित्रकथे त्यांचे मृतदेह म्हसावाद या मृतांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

Loading...
You might also like