Covid-19 : Skoda Auto Volkswagen च्या चाकण येथील प्लॅन्टमध्ये चेहर्‍याचं ‘कवच’ बनविण्यास सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारी हा एक मोठा धोका बनला आहे आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या देशात वैद्यकीय व्यावसायिकांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी आपले कार्य करत असताना स्कोडा ऑटो फोक्सवॅगनने पुण्याजवळील चाकण प्लांटमध्ये फेस कवचचे उत्पादन सुरु केले आहे. कार निर्मात्याने आपल्या प्लांटमध्ये बनवलेल्या फेस कवचचे फोटो शेअर केले आहे. जे आरोग्य कर्मचाऱ्यांना संक्रमित रूग्णांपासून वाचवेल. फेस शील्ड हे विषाणू रोखण्यासाठी डिझाईन केले आहे. डिझाईन साधी असून ते फॉगिंग रोखण्यास मदत करते.

हे फेस शील्ड 6 ते 8 तास वापरले जाऊ शकते. त्याचबरोबर हे स्वच्छ करुन तुम्ही त्याचा पुन्हा वापर करु शकता. कंपनी हे फेस मास्क तयार करत आहे ज्याला ससून जनरल हॉस्पिटलमध्ये डीन आणि आयसीयूने वापरण्यास मान्यता दिली आहे. याव्यतिरिक्त, कार निर्माता मुंबई, पुणे आणि औरंगाबादमधील रुग्णालयांना 35,000 सॅनिटायझर देणगी देत आहे. या संस्थेने औरंगाबादमधील स्वयंसेवी संस्थांना 50,000 खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्याचे सहकार्य केले आहे.

याव्यतिरिक्त स्कोडा ऑटो फोक्सवॅगनने देखील समर्पित सुविधेसाठी आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटी देण्याचे वचन दिले आहे जे 1100 कोरोना विषाणू रूग्णांना सामावून घेण्यास सक्षम असेल. पुण्यामध्ये ससून जनरल हॉस्पिटलसोबत ही सुविधा सुरू केली जात आहे. दरम्यान, आर्थिक योगदान, आरोग्य व्यावसायिकांसाठी व्यक्तीगत सुरक्षा उपकरण किट आणि औषधी उपभोगाच्या स्त्रोतांसाठी याचा उपयोग केला जाईल.