आली उडणारी कार ! अवघ्या 3 मिनिटांत बनते ‘विमान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या तीस वर्षांपासून स्लोव्हाकियाची एक कंपनी उडणाऱ्या कारवर कठोर परिश्रम घेत आहे आणि आता या कंपनीचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. क्लेन व्हिजन नावाच्या या कंपनीने नुकताच एक अश्या उडणाऱ्या कारची टेस्टिंग केली आहे, ज्याला जगातील फ्युचर व्हेहिकल मानले जात आहे. ही एअरकार केवळ जमिनीवरच चालणार नाही तर आकाशात उड्डाण करण्यातही यशस्वी होईल. खास गोष्ट म्हणजे ही कार अवघ्या तीन मिनिटांत विमानात रूपांतरित होते. या एअरकारचे वजन 1100 किलो आहे आणि त्यामध्ये अतिरिक्त 200 किलो वजन देखील लोड केले जाऊ शकते.

रिसर्च अँड डेव्हलपमेंट फर्म क्लेन व्हिजनने अलीकडेच यूट्यूब शेअरवर एअरकारचा व्हिडिओ बनविला असून हा व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे. क्लीन व्हिजनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर या कारच्या व्हिडिओवर लिहिले आहे – उडणाऱ्या कारची नवीनतम पिढी फक्त तीन मिनिटांत रस्ते वाहनातून हवाई वाहनात बदलू शकते. या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, हि एअरकार प्रथम कारमधून विमानात रूपांतरित होते आणि नंतर लँडिंगनंतर रस्त्यावर धावत असलेल्या कारसारखी दिसते.

ऑटो इव्होल्यूशननुसार, 2019 मध्ये फाइनल एअर प्रोटोटाइप लोकांना इंट्रोड्यूस करण्यात आला. एअरकारच्या या टेस्ट फ्लाइट्सला स्लोव्हाकियातील विमानतळावर करण्यात आले होते. या चाचणी उड्डाणांमध्ये दोन टेकऑफ आणि दोन लँडिंगचा समावेश होता आणि हे चारही यशस्वी झाले.

क्लेन व्हिजनचे सह-संस्थापक आणि पायलट अँटोन यांच्या म्हणण्यानुसार, एअर कारच्या सहाय्याने आपण आपल्या गंतव्यस्थानावर कोणत्याही एयरपोर्टच्या त्रासाशिवाय आणि कमर्शियल सिक्युरिटीजने पोहोचू शकता. आपण आपल्या ह्या एअरकारला ऑफिस, गोल्फकोर्स, मॉल, हॉटेल किंवा पार्कमध्ये देखील चालवू शकता. दरम्यान, हे एअरकार खरेदी करण्यासाठी एखाद्याला वाहन चालविण्याचा परवाना तसेच पायलट परवान्याची आवश्यकता असू शकते. कंपनीने अद्याप या एअरकारच्या किंमतीची घोषणा केलेली नाही. क्लेन व्हिजनचे प्राध्यापक स्टीफन क्लेइन यांच्या म्हणण्यानुसार, एअरकार जमिनीवरुन आकाशात पोहोचण्यासाठी 300 मीटर टेकऑफ सेटचा वापर करतो. याशिवाय ताशी 200 किलोमीटर वेगाने धावता येते. हे तंत्रज्ञान येत्या काळात परिवहन व्यवस्थेत क्रांती घडविण्यात यशस्वी होऊ शकेल अशी आशा आहे.