पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे विहिरीत पडलेल्या एका हत्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये विहिरीत पडलेला हा हत्ती बाहेर येण्याची धडपड करत आहे. हा हत्ती वारंवार बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओ कर्नाटकच्या मलई महादेश्वरा वन्यजीव अभयारण्यातला असून इंडियन फॉरेस्ट ऑफिसर येडुकोंडालू व्ही.यांनी ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
Rescued the male elephant fallen into agricultural well in Hoogyam ,MM Hills Wildlife Sanctuary.Thanks to villagers ,police ,media and forest frontline staff for cooperating.
@aranya_kfd @moefcc @wti_org_india @RandeepHooda @CentralIfs pic.twitter.com/BQLVTwbuZH— Yedukondalu V IFS (@ifs_yedukondalu) April 23, 2020
फॉरेस्ट ऑफिसर येडुकोंडालू व्ही. यांना हत्ती विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी वेळ न दवडता तातडीने क्रेन पाठवण्याची व्यवस्था केली. क्रेनने हत्तीला उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे क्रेनद्वारे विहिरीच्या जवळील माती हटवण्यास सुरूवात केली. एका बाजूने माती हटवल्यानंतर हत्ती आरामात बाहेर पडला. वन्यजीव अभयारण्यात विहिरीत पडलेल्या नर हत्तीची सुटका केली.
गावकरी, पोलिस, आणि वन-मोर्चाच्या कर्मचार्यांचे सहकार्याबद्दल धन्यवाद, अशा आशयाचे ट्विट करत येडुकोंडालू यांनी हत्तीची सुटका करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून आतापर्यंत जवळपास पाच हजार युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच यावर विविध कमेंट्सही युजर्स करत आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीदायक वातावरणात व्हिडिओ दाखल्याबाबत आभार अशा प्रतिक्रिया काही नेटकर्यांनी दिल्या आहेत.