वायरविना फक्त 19 मिनिटात फुल्ल चार्ज होईल स्मार्टफोन, लॉन्च झाली जबरदस्त टेक्नॉलॉजी

पोलीसनामा ऑनलाइन – Xiaomi ने ८० वॉटची रेटिंग असलेला लेटेस्ट आणि अडवॉन्स वायरलेस अशी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी लाँच केली आहे. याद्वारे ४०००mAh बॅटरीचा स्मार्टफोन केवळ १९ मिनिटांमध्ये चार्ज करता येवू शकतो, असे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तद्वतच त्याच कॅपसिटीची बॅटरी ही टेक्नॉलॉजी ८ मिनिटात ५० टक्क्यांपर्यंत चार्ज करते.

यापूर्वी आली होती ५० वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी

याआधी शाओमीने सर्वात वेगवान वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीला ऑगस्टमध्ये Mi 10 Ultra स्मार्टफोन सोबत ऑफर केले होते. ती ५० वॉटची होती. तर मार्च २०२० मध्ये कंपनीने आपली ४० वॉटची फास्ट वायरलेस चार्जींगवरुन पडदा हटवला होता.

Mi MIX 2S

वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीत शाओमी सर्वात पुढे आहे. कंपनीने सर्वात प्रथम Mi MIX 2S या स्मार्टफोनला ७.५ वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत इंट्रोड्यूस केले होते. त्यानंतर कंपनीने Mi MIX3 स्मार्टफोनमध्ये १० वॉट ची चार्जिंग सुविधा दिली. गतवर्षी कंपनीने Mi 9 हा स्मार्टफोन बाजारात आणला होता. त्यामध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग मिळत होते.

२०२१ मध्ये येणार १०० वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजी स्मार्टफोन

सध्या शाओमी १०० वॉट फास्ट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. ही टेक्नॉलॉजी बाजारात पुढील वर्षी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.