सिगारेटचे व्यसन महिलांसाठी घातक, वंधत्वाची शक्यता ६० टक्क्यांनी वाढते

पोलिसनामा ऑनलाइन टीम – सिगारेट ओढण्याचा संबंध एक्टोपिक प्रेग्नेंसीसोबत असू शकतो. या कारणामुळेच फॅलोपियन ट्यूबमध्ये समस्या होऊ शकते. एक्टोपिक प्रेग्नेंसीमध्ये अंड गर्भाशयामध्ये पोहोचण्याआधी फॅलोपियन ट्यूबमध्ये जाते. सिगारेटच्या व्यसनामुळे महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची शक्यता ६० टक्क्यांनी वाढते. यामुळे गर्भाशयामध्ये परिवर्तन होऊन गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका आणखी वाढतो. सिगरेटमधील रसायन अंडाशयामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स स्तरामध्ये असंतुलन निर्माण करते. यामुळेच पर्टिलायजेशनवर परिणाम होतो.

एका सर्वेमध्ये असे आढळून आले की, ८२ टक्के कॉलेज विद्यार्थीनीनी स्मोकिंग आवडते असे सांगितले. सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे फार आनंद मिळतो, असे या मुलींनी सांगितले. सुमारे ८७ टक्के मुली फक्त आवड किंवा आनंद मिळतो म्हणून सिगरेट पितात. त्यांना धुम्रपानाचे धोकेही माहिती होते. मात्र, स्मोकिंग करताना होणाऱ्या तोट्यांबाबत काहीच लक्षात राहत नाही. फक्त आनंद मिळतो, असे या मुलींनी सांगितले होते.

धुम्रपान करणाऱ्या महिलांना आईवीएफच्या दरम्यान अंडाशयाला उत्तेजित करणारी औषधे मोठ्या प्रमाणावर घ्यावी लागतात. गरोदरपणात धुम्रपान करणे गर्भातील बाळासाठी हानिकारक ठरते. तसेच धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये गरोदरपणात अनेक समस्यांचा निर्माण होतात. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला वावरणेही आरोग्यासाठी हानिकारक असते. तंबाखूचा धूर फक्त धुम्रपान करणाऱ्यांसाठीच नाही तर धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्याही हृदयाला धोका निर्माण करतो.