…म्हणून सलमान खानला आहे किसिंग सीन आणि न्यूडिटीची अ‍ॅलर्जी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या सिनेमांमध्ये त्याचा भर हा अ‍ॅक्शन सीनवर जास्त असतो. तुम्ही पाहिले असेल की, बोल्ड सीन किंवा किसिंग सीन सलमानच्या सिनेमांमध्ये दिसत नाहीत. न्यूडिटीपासूनही तो चार हात लांबच दिसतो. याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. आता नुकताच सलमानने या गोष्टीचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने यावर भाष्य केले आहे.

एका मुलाखतीत बोलताना सलमान म्हणाला की, “सिनेमांमध्ये जेव्हा किसिंग सीन येतो, तेव्हा कुटुंबीयांसोबत पाहताना खूपच विचित्र वाटतं. नग्नता आणि किसिंग सीन नसलेल्या सिनेमांवरच मी माझं लक्ष केंद्रीत करू इच्छितो. माझ्या बॅनरअंतर्गत निर्मित होणाऱ्या सिनेमांमध्ये अ‍ॅक्शन, रोमान्स, खट्याळपणा असावा असं मला वाटतं. जर माझा सिनेमा ‘A’ प्रमाणपत्राचा असेल तर त्यातील अ‍ॅक्शन सीनमुळे असावा. सिनेमांमधील किसिंग सीन आणि न्यूडिटीपासून मी लांबच राहतो.” असे सलमान म्हणाला.

मी उत्तम अभिनेता नाही असे म्हणत सलमान पुढे म्हणाला की, “माझ्यापेक्षा शाहरुख खान आणि आमिर खान दमदार अभिनेते आहेत. दोघांचा एखादा चित्रपट फ्लॉप असू शकतो परंतु नेहमीच त्यांचा परफॉर्मन्स उत्तम असतो. माझ्याबाबतीत असे घडत नाही. माझ्यात जेमतेम अभिनय कौशल्य आहे आणि नशीबामुळे मी या इंडस्ट्रीत टिकतोय.” असेही त्याने स्पष्ट केले.